
पुणे : आपत्ती व्यवस्थापनाचा एवढाच अनुभव असेल तर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना चीनला पाठवा, असा हल्लाबोल राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे ऋषिकेश देशमुख यांनी केला आहे.
भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी आज ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिकास्त्र सोडले आहे. ‘कोरोनावर मात करण्यासाठी शून्य प्रशासकीय अनुभव असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी आपत्ती व्यवस्थापनाचा अनुभव असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच गरज आहे, असे डावखरे यांनी म्हटले आहे. त्यावर देशमुखानी सडकून टीका केली आहे. डावखरे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष असतानी देशमुख हे औरंगाबाद मध्य अध्यक्ष होते. पदवीधरांचे विधानसभेत नेतृत्व करणारे डावखरेना शहाणपण नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग ? अशी बोचरी टीका देशमुख यांनी केली आहे. त्यापलीकडे जाऊन आपत्तीची एवढा अनुभव असलेल्या तुमच्या नेत्याला चीन, इटलीला घेऊन जाण्याचा सल्लाही त्यांनी डावखरेंना दिला आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे धडाडीने निर्णय घेत आहेत. त्याचवेळी राज्यातील लोकांना दिलासा देत, कोरोनाचे युध्द जिंकण्याचा विश्वास मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केला आहे. ही स्थिती हाताळण्यारून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची पाठ सोशल मिडीयात सर्वसामान्य जनतेकडून थोपटली जात असताना. डावखरे यांच्या या विधानाचे मात्र सोशल मीडिया वर प्रतिक्रियांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरेंसह टोपेंचे कौतुक करताना माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना चिमटे काढले जात आहेत.











