Fight against corona: विविध उद्योग समूहाच्या वतीने कोरोना विरुद्ध लढण्यासाठी मदत जाहीर, टाटा समूहाकडून 1500 कोटीची मदत

बजाज कडून 100 कोटी तर अक्षय कुमार कडून 25 कोटी, शिर्डी साई संस्थानच्या वतीने 51 कोटी जाहीर

मुंबई :

करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. यामध्ये टाटा ग्रुपने आजवरची सर्वात मोठी मदत जाहीर केली आहे. टाटा ट्रस्टने केंद्र सरकारला विविध उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांच्या मदतीची शनिवारी घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच टाटा सन्सने अतिरिक्त १००० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.  

करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी सरकारला मदत म्हणून वाहनउद्योग श्रेत्रातील बजाज समुहाने १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीचा वापर देशात आरोग्यसेवा पुरवाणाऱ्या यंत्रणांचे सबलिकरण करण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होणार आहे.

तसेच काही कलाकारांनीही मदत केली आहे. तसेच राजकीय लोकप्रतिनिधींकडूनही मदत होत आहे. आमदार आणि खासदारांनीही मदत केली आहे. तसेच राज्यातील उद्योगपतींनीही हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोना विरुद्धचा लढा जिंकण्यात मोठी मदत होणार आहे. करोनाशी लढण्यासाठी केंद्राच्या आणि राज्याच्या सहाय्यता निधीसाठी मदतीचा ओघ सुरु झाला आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. यानंतर अभिनेता अक्षकुमारने 25 कोटींची मदत जाहीर केली आहे.

भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासने कोरोना विषाणूविरोधातील लढ्यात आपले महत्त्वाचे योगदान बजावले आहे. आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक विजेत हिमादासने आपला एका महिनचा पगार आसाम सरकारच्या आरोग्य विभागाला दिला आहे. हिमाने आपल्या टि्वटर अकाउंटवर यासंदर्भातली घोषणा केली आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानने करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ कोटी रुपये दिले आहेत. राज्यावर करोनाचं संकट आहे. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर देशात लॉकडाउन आहे. त्यामुळेच शिर्डी साईबाबा संस्थानने ५१ कोटींची मदत राज्य सरकारला केली आहे.