महाराष्ट्रातील सर्व बोर्डांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक – मुख्यमंत्री

दाक्षिणात्य राज्यांनी मातृभाषा ही इंग्रजी व इतर भाषेच्या माध्यमांच्या आणि CBSC,  ICSC, आणि IB बोर्डाच्या शाळेत सक्तीने शिकण्याचा कायदा केला आहे. तसाच नियम महाराष्ट्रामध्ये लागू होऊन मराठी भाषा सर्वच बोर्डात सक्तीची करण्यात यावे यासाठी आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विधानपरिषद सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित केला होता.

महाराष्ट्रामधील सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळात केली. तसेच सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यासाठी कठोर कायदा केला जाईल असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सांगितले.