अमरावतीं जिल्ह्यत ४६ हजार रुपयांचा गुटखा सापडला, पोलिसांची कारवाई!

अमरावती – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात लॉक डाऊन असल्याने सर्व वाहतूक बंद आहे. तरीसुद्धा अचलपूर तालुक्यातील मल्हारा या गावातील आकाश गुप्ता याने स्वतः च्या घरी गुटखा साठवून करून ठेवला होता.

याची गुप्त माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच त्यांनी आज आकाश गुप्ता यांच्या घरी धाड टाकून तब्बल ४६ हजार २०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.

याप्रकरणी आरोपी आकाश गुप्ता याला पोलिसांनी अटक केली असून एकाच आठवड्यातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहे.