
मुंबई: राज ठाकरे यांना आलेल्या नोटिशीनंतर आक्रमक झालेल्या व २२ ऑगस्ट रोजी ‘ईडी’च्या कार्यालयावर धडकण्याच्या तयारीत असलेल्या मनसेनं अचानक आपला निर्णय बदलला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ‘ईडी’च्या कार्यालयावर येऊ नये, अशा सूचना पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्या आहेत. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.
ट्विटरच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. ‘माझ्यावर आतापर्यंत अनेक खटले दाखल झाले. प्रत्येक वेळी आपण सर्वांनी तपास यंत्रणा व न्यायालयाचा आदर केला आहे. आताही तेच करू. त्यामुळं येत्या २२ ऑगस्टला शांतता राखा. कुणीही ‘ईडी’च्या कार्यालयाबाहेर जमू नका.






