Corona Effects: घरी बसून कंटाळले, सोशीअल मीडियावर सुरू झाला नवीन ट्रेंड

औरंगाबाद :- सध्या जगभरात कोरोना ने हाहाकार माजलेला आहे. भारतातही कोरोणाने प्रवेश करून सर्वांची झोप उडवली आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या देशात सगळ्यात मोठी आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने लॉक डाऊन करून सर्वांना वर्क फ्रॉम माय करण्यास सांगितले आहे.

देश पातळीवर भारतातही कोरोना आल्याने पंतप्रधान मोदी यांनी २१ दिवसाचे लॉकडाउन घोषित केलेले आहे. यामुळे सर्वांना घरात राहावे लागत आहे. अशात फावल्या वेळेत काय करावे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. मात्र नेटिझन्सने रिकाम्या वेळेचा उपयुक्त वापर करीत जुन्या आठवणींना उजाळा देणे सुरू केले आहे.

कोरोना व्हायरस ची सर्वांनाच भीती वाटत आहे. याची लागण आपल्याला होऊ नये म्हणून सर्वजण खबरदारीचे सर्व प्रयत्न करत आहे. भारतात कोरोना चा वाढतात प्रभाव पाहून २१ दिवसाचा लॉकडाउन करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणालाही घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

कंपन्या,कॉलेज,ऑफिस बंद ठेवल्याने अनेकांना फावला वेळ मिळाला आहे. वेळ घालवण्यासाठी इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे अनेक जण एकमेकांच्या संपर्कात आले आहे. जुन्या आणि सध्याच्या फोटोमध्ये बदल झालेला पाहून युवक मंडळी आपला फावला वेळ मार्गी लावत आहे. केवळ युवकच नाही तर पन्नाशी गाठलेले ज्येष्ठ नेटिझन्स देखील हा ट्रेण्ड सोशल मीडियावर पाळताना दिसत आहे.

नवीन दिवस उजाडल्यावर काय करावे असा प्रश्न प्रत्येकाला पडत आहे. मात्र युवक नवनवीन शक्कल लढवत आपला फावला वेळ उपयोगी आणत आहे. लोकडाउन मुळे प्रत्येक जण सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाला आहे. काहींना तर सोशल मीडियावर दहा वर्ष पेक्षा अधिक दिवस झालेले आहे. याच सोशल मीडियावरील जुने फोटो उकरून काढण्याचा ट्रेंड बघायला मिळत आहे.