एप्रिल फूल कराल तर खाल जेलची हवा

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात जर कोणी एप्रिल फूलच्या नावाखाली चेष्टा केली अथवा अफवा पसरवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. देशावर कोरोनाचे वाढते संकट आणि लॉकडाऊन यामध्ये कोणीही कोरोनासंबंधित कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणारे आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे मॅसेज टाकू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘१ एप्रिल या दिवशी सर्वजण दरवर्षी आपल्या सहकारी, मित्रांची एप्रिलफूलच्या नावाखाली चेष्टामस्करी करतात. संपूर्ण देश आणि महाराष्ट्र कोरोनाविरोधात लढत आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये कोणीही एप्रिल फूलच्यादिनी कोणत्याही प्रकारची अफवा किंवा चेष्टा करू नये. याकरिता सर्वांनी सहकार्य करावे. याबाबतीत जे कोणी सहकार्य करणार नाही किंवा अफवा पसरवेल. त्यांच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे सांगत आरोग्यमंत्र्यांनी सर्वांना सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे.