
मुंबई:
महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 302 वर गेला आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरूचं आहे. आज दिवसभरात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या बातम्या कानावर येत आहे. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली नाही. फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराची टप्प्यात विभागणी केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे. वेतन कपात केली आहे, असा गैरसमज करू नका फक्त आपल्याला आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी ही मांडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महत्तावाचे मुद्दे :
- कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे
- अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून आभार
- परदेशातून परतलेल्यांनी माहिती लपवू नये
- गरीब मजुरांनी राज्यातून बाहेर जाऊ नये
- इतर राज्यातील मजुरांची सरकारने जबाबदारी घेतली
- अन्न- धान्याचा साठा पुरेसा आहे, तुटवडा भासणार नाही
- राज्य सरकारकडे जीवनावश्यक वस्तूंचा भरपूर साठा
- बाजार, किराणा दुकानात गर्दी नको
- सर्दी,खोकल्याची लक्षणं असल्यास, सरकारी रूग्णालयात जा
- खासगी दवाखान्यांची गरज आहे, बंद ठेऊ नका
- मजुरांनी आहात तिथेच थांबा, स्थलांतर करू नका
- राज्यांच्या सीमा बंद,अनावश्यक गर्दी टाळा






