शिवसेनेकडून राज्यसभेवर प्रियांका चतुर्वेदी

मुंबई : राज्यसभेचा शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला आहे. दिवाकर रावते, चंद्रकांत खैरे, शिवाजी आढाळराव पाटील यांची नावं चर्चेत असतानाच शिवसेनेनं प्रियंका चतुर्वेदींसारख्या उमद्या आणि युवा नेत्यांमधील प्रसिद्ध चेहऱ्याला संधी दिली आहे. तर चंद्रकांत खैरे यांनी देखील या विषयी खदखद व्यक्त केली आहे. खैरे म्हणाले, माझ्या शहराला खासदारकीची आवश्यकता होती. आदित्य साहेबांना आवडलं नाही. मी माझं काम करत राहील. मी बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अनेक वर्ष काम केलंय. उद्धव ठाकरे यांच्यासोबतही काम केलं. त्यांना आता वाटतं की नवीन लोकांना संधी दिली पाहिजे. पण मी स्मशानात जाईपर्यंत शिवसैनिक राहील. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे, संधी मिळाली असती तर लढायला बळ मिळालं असतं.