राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ३३५,मृतांचा आकडा १३ वर,तर ४१ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई – शहरात आज कोरोनाचे ३० नवीन रुग्ण आढळले असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३३५ वर पोहचली आहे.

पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने अर्धशतक पूर्ण केले आहे. राज्यातील कोरोनाबाधित मृतांचा आकडा १३ झाला आहे.

दरम्यान, उपचारांनंतर कोरोनाचे ४१ रुग्ण पूर्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात एकूण ७०५ जण विविध रुग्णालयांमध्ये भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६४५६ नमुन्यांपैकी ३३५ जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत ४१ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २४८१८ व्यक्ती अलगीकरणात असून १८२८ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

जिल्हानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कंसात मृतांची संख्या दिली आहे.

मुंबई १८१ (९)
पुणे जिल्हा ५० (१)
सांगली २५ (०)
ठाणे मंडळातील इतर मनपा व जिल्हे ३६ (२)
नागपूर १६ (०)
अहमदनगर ८ (०)
यवतमाळ ४ (०)
बुलडाणा ४ (१)
सातारा २ (०)
कोल्हापूर २ (०)
औरंगाबाद १ (०)
रत्नागिरी १ (०)
सिंधुदुर्ग १ (०)
गोंदिया १ (०)
जळगाव १ (०)
नाशिक १ (०)
इतर राज्य (गुजरात) स्थलांतरीत १ (०)