अखेर युतीचं ठरलं

भाजपा 144, शिवसेना 126, मित्रपक्ष 18 आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री

नवी दिल्ली: सलग आठ तासापेक्षा जास्त वेळ झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत युतीचा फॉर्म्युला ठरलं असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळते. अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाची बैठक सुरु असून युतीबाबत सूत्र ठरविण्यात आले आहे.

याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रानुसार भाजपा 144, शिवसेना 126 आणि मित्रपक्षांना 18 असं ठरलं असल्याचे समजते. विशेष म्हणजे शिवसेनेची उपमुख्यमंत्री पदाची मागणी मान्य करून युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आदित्यला उपमुख्यमंत्री पद ही शिवसेनेची मागणी मान्य करण्यात आली आहे. आता शिवसेनेची प्रतिक्रिया जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. याबाबत दोन्हीही पक्षाकडून अधिकृत घोषणा मुंबईत करण्यात येईल.