मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोना बाधित रुग्ण सापडला 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री परिसरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णाची माहिती मिळताच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. मातोश्रीच्या काही मीटर अंतरावर असणाऱ्या एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी यांची तातडीने कोरोना तापसणी होणार आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे अंगरक्षक आणि कार्यालयीन कर्मचारी बदलले जाण्याचीही शक्यता आहे. मातोश्री परिसरात कर्तव्यावर असणारे बरेच पोलीस कर्मचारी या चहा विक्रेत्याकडे चहा पिण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव या कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. जवळपास 180 हून अधिक कर्मचारी या परिसरात कार्यरत असतात.