धारावीमध्ये आणखी २ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली

मुंबई – धारावीत आणखी दोघांना करोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं आहे.

करोनाची लागण झालेल्या महिलेच्या वडील आणि भावाला करोनाची लागण झाली असल्याचं समोर आलं आहे.

यानंतर पोलिसांकडून डॉक्टर बलिगा नगर परिसर सील करण्यात आला आहे.

दरम्यान परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु आहे.

यासोबत धारावीतील करोनाबाधितांची संख्या ७ वर पोहोचली आहे.

यामध्ये एका मृताचाही समावेश आहे.