
मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि त्यांची पत्नी सामिया गोस्वामी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे.
एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
यानुसार अर्णब गोस्वामी पत्नीसोबत स्टुडिओमधून आपल्या घरी परतत असताना त्यांच्यावर दोन अज्ञातांनी हल्ला केला.
रात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला.
याप्रकरणी एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी कारवाई करत दोन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे.






