केशरी शिधापत्रिकाधारकांना उद्यापासून सवलतीच्या दरात गहू, तांदूळ विक्री

मुंबई – टाळेबंदीमुळे आपापल्या घरातच बंदिवान होऊन बसावे लागलेल्या समाजातील अत्यल्प उत्पन्न गटातील  केशरी शिधपात्रिधारक कु टुंबांना सवलतीच्या दरात अन्नधान्य वितरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शुक्रवार २४ एप्रिलपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यांना ८ रुपये  किलो दराने गहू व १२ रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येणार आहे.

मुंबई परिक्षेत्रातील ५७ लाख लोकांना त्याचा लाभ मिळेल, अशी माहिती नियंत्रक शिधावटप व संचालक नागरी पुरवठा, कैलास पगारे यांनी दिली.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या दारिद्री रेषेखालील कुटुंबांना रास्तभाव दुकानांमार्फत २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येतो.

मुंबई परिक्षेत्रात मुंबई व ठाणे जिल्ह्य़ातील शहरीभागाचा समावेश होतो. या परिक्षेत्रात के शरी शिधात्रिकाधारकांची संख्या १३ लाख ६२ हजार ७५२ असून सदस्य संख्या ५७ लाख २० हजार २४० इतकी आहे.

शुक्रवारपासून त्यांना सवलतीच्या दरात गहू व तांदूळ देण्यात येणार आहे.त्यासाठी २९ हजार ३१० मेट्रिक टन अन्नधान्य लागणार असून, त्याची पूर्ण व्यवस्था करण्यात आल्याचे पगारे यांनी सांगितले.