मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधान परिषद निवडणूक अर्ज दाखल

मुंबई : काँग्रेस पक्षाने आपला दुसरा उमेवार उभा करण्याचा हट्ट मागे घेतला म्हणून विधान परिषद निवडणूक बिविरोध होणार हे निच्छित आहे. नऊ जागांसाठी होत असलेली ही निवडणूक बिविरोध होईल दरम्यान आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन, शिवसेनेचे दोन, व काँग्रेस चा एक उमेदवार रिंगणात आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब सहपरिवार अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थिती लावली. ठाकरे यांच्या सोबत पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस तसेच मिलिंद नार्वेकर व एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. यानंतर शिवसेना नेते नीलम गोऱ्हे यांनी देखील त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.