आज रात्री ८.०० वाजता, पंतप्रधान मोदी साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मंगळवारी रात्री आठ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

या संदर्भात नुकतीच पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर माहिती जाहीर केली आहे.

पंतप्रधान मोदी यांनी काल सोमवारी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना आणि लोक डाऊन संदर्भात सविस्तर चर्चा केली होती.

त्यानंतर आज लागलीच दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधणार आहे.

देशात कोरोनाचे वाढते संक्रमण, स्थलांतरितांचा प्रश्न व अनेक महत्त्वाच्या विषयांवर ,पंतप्रधान मोदी काय बोलणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागून राहणार आहे.