दहावीचा निकाल जाहीर, कोकण विभाग नंबर एक; परत एकदा मुलीच पुढे.

मुंबई, 8 जून : महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शनिवारी (दिनांक 8 जून) जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता हा SSC result विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येईल. SSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटवर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहता येईल.

दरम्यान, बोर्डाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला असून नागपूर विभागाच्या निकालाची टक्केवारी सर्वात कमी आहे, यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

मुली : 82.82 टक्केमुले : 72.18 टक्के यावर्षी 12 लाख विद्यार्थी पास झाले असून एकूणच उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींची आकडेवारी 77.10 टक्के आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 12 टक्क्यांनी कमी लागला आहे.

बोर्डानिहाय निकालाची टक्केवारी पाहिल्यास नेहमीप्रमाणेच कोकणचा निकाल 88.38 टक्क्यांसह टॉपवर आहे. तर नागपूरचा निकाल सर्वात कमी आला आहे. पुणे 82.48%, नागपूर 67.27%, औरंगाबाद 75.20%, मुंबई 77.04%, कोल्हापूर 86.58%, अमरावती 71.98%, नाशिक 77.58% आणि लातूर बोर्डाचा निकाल 72.87% इतका लागला आहे.

कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 88.38 टक्के लागला आहे. नेहमी प्रमाणेच यावेळी सुद्धा मुलींनी बाजी मारली. बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाइटला भेट देऊन निकाल पाहू शकता.