
बुलडाणा :- कोरोना संसर्गजन्य साथीच्या रोगाने संपूर्ण जग जागच्या जागी थांबले आहे. आपल्या भारत देशात आणि महाराष्ट्र्र राज्यात महिना भरासाठी लॉकडाउन घोषित केलेले आहे. अश्या महाभयानक परिस्थितीत गोरगरीब, कष्टकरी, वृद्ध, निराधार व रोजनदारी करुण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या च्या पोटा पाण्याचा मोठा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील मासरूळ सर्कल मधील गिरडा ग्रामपंचायतीत येणाऱ्या मेरखेड या छोट्याश्या गावात स्वातंत्र्य काळापासून पिठाची गिरणी नाही. शेजारच्या गावातील पीठ गिरणी तून दळण घेऊन यायचे, असा या गावातील लोकांचा दिनक्रम असायचा. त्यातच कोरोना च्या धास्तीने सुरक्षिततेचा उपाय म्हणून आजूबाजूच्या सर्व गावांनी बाहेर गावातील नागरिकांना गावबंदी केल्यामुळे. आता गहू,ज्वारी दळून आणायची कोठून आणि दोन वेळचा स्वयंपाक बनवायचा कसा आसा प्रश्न परिसरातील छोट्या गावातील गावकऱ्यांना पडला होता ?

अशातच शेतकरी,कामगार वर्गात आपला माणूस म्हणून प्रचलीत असलेले ॲड. सुनील हासणराव देशमुख भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या तर्फे धाड़ व मासरूळ विभागात येणाऱ्या सर्व गावातील अत्यंत गरजवंत कुटुंब,व्यक्ती यांना अन्नधान्या व जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात येणार आहे. असे आव्हान देशमुखानी सोशल मीडिया च्या माध्यमातून केले होते. त्यांची ही पोस्ट पाहून मेरखेड येथील पोलीस पाटिल यांनी ॲड.सुनील देशमुख यांच्याशी संपर्क साधत गावात पिठाची गिरनी नसल्या कारणाने ग्रामस्तानवर पिठामुळे उपासमारीचा प्रश्न उद्भावत असल्याचे सांगितले. ही गंभीर समस्या पाहता देशमुख यांनी एकाच दिवसात सुमारे पंचवीस हजार रुपयांची पिठाची गिरणी पोहोच करून गावकऱ्यांना भेट म्हणून दिली. आणि मिरखेड़ वासियांची तसेच परिसरातील अनेक छोट्या गावांची पीठावाचून होणारी उपासमारीची समस्या मिटवली.

भारत देश हा कोरोना ची लढाई लढत असताना समाजातील दानशूर व समाजसेवकांनी या लढ्यात हातभार लावावा असे आव्हान पंतप्रधान मोदींनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत देशमुख यांनी धाड मासरूळ सर्कलमधील गरजूंच्या मदतीसाठी पुढाकार घेतला.
श्री.सुनील देशमुख यांच्या कडून मेरखेड येथे आटा चक्कीची भेट मिळाल्यामुळे ग्रामस्थांमधे आनंदाचे व समाधानाचे वातावरण होते. दरम्यान त्यांच्या या संकट काळात केलेल्या सहकार्यामुळे गावकर्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले व आपल्या हातुन असेच समाजहिताचे कार्य निरंतर होत राहो ही अपेक्षा उपस्थित ग्रामस्थांनी व पोलीस पाटील यांनी व्यक्त केली.
दरम्यान देशमुख यांनी बोलताना सांगितले के या संकटकाळा समई गर्जुना २९ मार्च ते १४ एप्रिल पर्यंत त्यांच्या गरजेच्या हिशोबाने मदत कार्य चालू राहणार असून आपन सर्वानी याची माहिती धाड़ मासरूळ विभागातील अडचणीत असणाऱ्या गरजु लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून माझ्या सामाजीक परिवारतील कोणता परिवार किंवा व्यक्ति उपाशी झोपता कामा नये.
देशमुख परिवार हा समाजातील उपेक्षितांना आधार देण्याचे काम गेल्या 40 वर्षापासून करीत आहे. ज्येष्ठ समाजसेवक शेतकरी नेते स्व.डॉ. हासणराव देशमुख साहेब यांच्या समाजकार्याचा वसा ॲड. सुनील हासणराव देशमुख व त्यांचे कुटुंबीय पुढे अखंडित चालवत आहे असे देखील धाड मासरूळ विभागातील स्व.डॉ. हासणराव देशमुख यांच्या परिचायतिल व सहकाऱ्यांनी सांगितले तसेच सुनील देशमुख हे करत असलेल्या कामासाठी देखील समाधान व आनंद व्यक्त करात आहे.
संचार बंदीमुळे प्रत्येक जण आपल्या कुटुंबाबरोबर घरी बसत आहे. अशावेळी आपला जीव धोक्यात घालून गोरगरीब, कष्टकरी परिवारान साठी अशा स्थितीत त्यांची उपासमार होऊ नये म्हणून धाड व मासरूळ विभागातील गरजवंतांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तू चे मदत कार्य करत आहे.
दरम्यान देशमुख हे या बाबतीत युवा प्रगतीशी बोलत असतांना म्हणाले की. देशमुख परिवार देखील गरीब परिस्थितीतून आलेला आहे त्यामुळे होणारे हाल आणि उद्भवणारे प्रश्न याची जाण आम्हाला असल्यामुळे माझे शेतकरी बांधव संकटात असताना त्यांच्या मदतीला धावून जाणे सहकार्य करणे हे आम्ही आमच्या वडिलांकडून प्रेरणा घेऊन निस्वार्थ काम करत आहेत. अश्या महाभयानक परिस्थितीत गोरगरीब, कष्टकरी, वृद्ध, निराधार यांच्या पोटा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे.

अश्या परिस्थितीत आपल्याकडून जे जे शक्य होईल ते प्रयत्न आपण केले पाहिजेत, आपण स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा सर्वोच्च मानून,सरकारचे नियम पाळून,इतरांना मदत करण्यासाठी पुढे आले पाहिजे, एक भारतीय म्हणून ते आपले कर्तव्य आणि जबादारी आहे ते मी करत आहे तसेच आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करू इच्छितो की आपापल्या परीने शक्य असेल तेवढी शक्य असेल ती मदत आपण संकटात असलेल्या कुटुंबांना केली पाहिजे वा करावी.






