
गरजूंना मोफत अन्न धान्य वाटप, डॉक्टरांना पी पी ई किट्स, मास्क वाटप
मुंबई: कोरोनाची महामारी भारतात आली आणि त्यानंतर महाराष्ट्रात खासकरून मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात या रोगाने रौद्र रूप धारण केलेले दिसत आहे. देशात लॉक डाऊनचे तीन टप्पे संपून चौथा टप्पा सुरू झाला आहे.
सरकार आपल्या स्तरावर या जागतिक महामारीवर लढा देत आहे परंतु अनेक कारणांमुळे विविध आरोग्याविषयी आणि नागरिकांच्या जगण्याविषयी समस्या वाढत आहेत. सरकारी मदत तोकडी पडत आहे अशावेळी विविध सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्ती पुढे येवून कोरोना विरुद्धच्या या लढ्यात सहभागी होताना दिसत आहेत.

अशाच प्रकारे महाराष्ट्र राज्य अधिकारी व कर्मचारी असोशिएशन आणि प्रगती फाऊंडेशन यांच्या वतीने मुंबई आणि सभोवतालच्या परिसरात विविध मदत कार्य सुरू आहे. कोरोनाच्या या संकट काळात कुर्ला, सायन, चेंबूर, गोवंडी, भिवंडी, नालासोपारा, आणि पनवेल येथील अनेक वस्तीतून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यात तांदूळ, गहू, डाळी, तेल, ड्रायफ्रूट , साखर आदी वस्तूंचं मोफत वाटप करण्यात आले.
तसेच आरोग्य क्षेत्रात मार्ड या डॉक्टर संघटनेच्या आवाहनानुसार सायन रुग्णालयात मोफत पी पी ई किट्स तसेच N 95 फेस मास्कचे वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्य अधिकारी व असोशिएन संस्थेचे अध्यक्ष श्री हाजी सैपन जतकर,(उपायुक्त, जीएसटी),
उपाध्यक्ष श्री अज़ीज शेख (आयुक्त, धुळे महानगरपालिका), श्री सलीम शेख (कार्यकारी अभियंता), श्री रज़ा खान (उप संचालक, नगर रचना) , श्रीमती अमीना शेख उपायुक्त (सामाजिक न्याय ), श्री मोहम्मद यूसुफ निशनदार ( माजी कार्यकारी अभियंता, सिडको ), सरचिटणीस श्री अशपाक शेख (सहायक संचालक, नगर रचना , पनवेल महानगरपालिका), सचिव श्री नज़ीर शेख (उपायुक्त, जीएसटी ), श्री यासीन मापारा (कार्यकारी अभियंता, सिडको ), खजिनदार श्री दस्तगीर मुल्ला (राजपत्रित स्टेनो), सह खजिनदार श्री सुहेल खान (माजी कार्यकारी अभियंता, सिडको ), श्री तनवीर सैय्यद (सहायक आयुक्त, जीएसटी ), श्री इमरान मुजावर (राज्यकर अधिकारी ), श्री एन. जी.शेख (माजी मुख्य सर्वेयर, सिडको) संस्थेचे मार्गदर्शक, मा. एजाज नक़वी (माजी संचालक,लेखा व कोषागारे ), चार्टर्ड अककॉउंट श्री अकबर खान , उद्योगपती सैफुल्लाह खान व प्रगती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण राणे, प्रो. मनी व मुख्य सल्लागार व सदस्य ऍडव्होकेट श्री सलिम पटेल यांचे विशेष सहकार्य लाभले.







