महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठ/ तंत्र निकेतन महाविद्यालय/ ऑटोनोमास अभियांत्रकी महाविद्यालय यांच्या कडील जमा असलेली परीक्षा शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने ऋषिकेश देशमुख यांची मागणी

पुणे: सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव याचा विचार करता २०१९ / २० या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा एप्रिल /मे महिन्यात होणार होत्या, यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क देखील कॉलेज व विद्यापीठाकडे बहुतांश प्रमाणात जमा केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता या शैक्षणिक वर्षाच्या अंतिम वर्षाचे सत्र वगळता सर्व परीक्षा ह्या रद्द केलेल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने विद्यापीठ अनुदान आयोग यांना अंतिम सत्राच्या परीक्षा सुद्धा रद्द करण्यात याव्या अशा स्वरूपाचा प्रस्ताव पाठविला आहे.
याविषयी सर्व प्रथम महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे या निर्णयाचे स्वागत केले आहे.
२०१९/२० या शैक्षणिक वर्षाच्या एप्रिल/में मध्ये होणाऱ्या विद्यार्थांची परीक्षा होणार नसून. या शैक्षणिक वर्षातील परीक्षेसाठी भरलेले शुल्क सर्व महाविद्यालय व विद्यापीठ यांच्याकडे जमा आहेत. परीक्षा फीस च्या माध्यमातून परिक्षार्थीचा जमा होणारा पैसा हा राज्यातील सर्व विद्यापीठाकडेच जमा असणार आहे तसेच परीक्षा होणार नसल्यामुळे उत्तर पत्रिका व इतर परीक्षेवर होणारा खर्च हा आता होणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने अशी मागणी करण्यात आली आहे की, ही संपुर्ण परीक्षा फीस शासनाने मुख्यमंत्री सहायता निधित जमा करावी किंवा सदर फीस ही विद्यार्थना परत करण्यात यावी.
याबाबत अधिक माहिती देताना महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे ऋषिकेश देशमुख यांनी सांगितले की, “महाराष्ट्रवारच नव्हे तर संपूर्ण देशावर कोरोना महामारी चे मोठे संकट आलेले असून यामुळे महाराष्ट्रासह भारत देशाची देखील आर्थिक स्थिति ही ढासळत आहे. ही जागतिक महामारी असल्या मुळे व या मोठ्या संकटात राज्य सरकार, डॉक्टर, नर्सेस, सफाई कामगार, पोलिस व सर्वच वॉरियर्स हे मोठ्या हिमतीने लढत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असलेल्या विद्यापीठ व या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थांची संख्या बघितल्यास त्यांच्या सर्व विद्यापीठाकडे परीक्षा फीस च्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही जवळपास १०० कोटि च्या वर जाऊ शकते. ही मोठी रक्कम सर्व विद्यापीठाकडे पडून आहे. हा पैसा विद्यापीठाने राज्याच्या मुख्यमंत्री सहायता निधित जमा केल्यास महाराष्ट्रासाठी लढत असलेल्या पोलीस, डॉक्टर व सफाई कामगार यांच्या सुरक्षितेसाठी किंवा इतर आरोग्य सेवा योजनेसाठी वापरता येऊ शकतो.”


याबाबत अधिक तपशीलवार आकडेवारी देताना श्री देशमुख यांनी स्पष्ट केले की, ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठाकडे २,३४,७५१ लाख विद्यार्थी, कवियत्री बहिनाबाई चौधरी उत्तर महारष्ट्र विद्यापीठाकडे 50,000 हजार विद्यार्थी , कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, नागपुर 10,000 हजार विद्यार्थी , गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली 55,000 हजार विद्यार्थी , स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड़ विद्यापीठत 1,15,000 हजार विद्यार्थी याशिवाय मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, आणि इतर खाजगी तथा अनुदानित विद्यापीठ असे एकत्र करून महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाच्या विद्यार्थांची संख्या बघितल्यास हा आकड़ा हा २४ ते २५ लाखा पर्यंत असू शकतो. या सर्व विद्यापीठाची परीक्षा फीस ही १०० कोटिच्या वर असू शकते. हा पैसा जर का राज्य सरकारला मिळाला तर शासनाला कोरोनाच्या लढाईत या पैशाची कुठेतरी मदत होईल.”
या विद्यापीठाकडे जमा असलेल्या रक्कामेमुळे विद्यापीठला फार काही नुकसान होणार नसून यामुळे विद्यापीठाची आर्थिक परिस्थिति देखील काही ढासाळनार नाही अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे ऋषिकेश देशमुख यांनी ईमेल द्वारे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उच्य व तंत्रशिक्षण मंत्री उदय रविंद्र सामंत हे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीचा सकारात्मक विचार करतील असा आशावाद श्री ऋषिकेश देशमुख यांनी व्यक्त केला आहे.