
नवी मुंबई: कोरोनच्या लढ्यात अंगणात नाही तर रणांगणात उतरून जनसेवा करण्याचा विचार नेरूळ नवी मुंबई विभागातील शिवसैनिकांनी केला. विभागातील हातावर पोट भरणाऱ्या मोल मजुरी करणाऱ्या गरजवंत गोरगरिबांच्या हाल होऊ नये म्हणून शिवसेना शाखा क्रमांक 92/99 उपविभाग प्रमुख श्री संतोष पाटील आणि उपशाखा प्रमुख श्री कुणाल निरभवणे विभागात रोज 300 गरजवंतांना अन्न दान वाटप सुरू केले आहे.

जन सेवेचा आज तिसरा दिवस होता. या अगोदर सलग दोन दिवस विविध भागातील गरजूंना अन्न वाटप करण्यात आले . तसेच सध्या होत असलेल्या राजकारणामुळे व नाहक सरकारची करीत असलेल्या बदनामीची पोल खोल श्री पाटील, व स्थानिक शिवसैनिकांनी केली. महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस जे परप्रांतीय मजूर ह्यांना त्यांचा राज्यात जाण्या साठी त्यांचा कडून 1500 रुपये तिकिटाचे भाडे घेत आहे त्याच संदर्भात पाटील यांनी नवी मुंबईतील परप्रतिय मजुरांशी बोलणे केले. याबाबत त्यांना अशी माहिती मिळाली की, महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस हे कोणाकडूनही पैसे घेत नाही. हे त्यांनी स्पष्ट केले आहे.

त्याचा विडिओ श्री संतोष पाटील यांनी पोस्ट केला आहे. पाटील यांनी विनंती केली आहे की महाराष्ट्राची ,महाराष्ट्र सरकारची आणि दिवस रात्र जनतेचा सेवे साठी काम करणाऱ्या आपल्या पोलीस बांधवांची बदनामी करू नका ..कृपया सर्वांनी आपल्या महाराष्ट्र संस्कृतीचा मान राखावा अशी अपेक्षा करतो.







