सामाजिक दायित्व जपणारी सामजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था – प्रगती फाऊंडेशन

सामाजिक दायित्व जपणारी सामजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था – प्रगती फाऊंडेशन

 

प्रगती फाऊंडेशन मुंबई (रजि.) हे नाव आता राज्यातील्च नव्हे तर भारतातील अनेक भागात परीचित झाले आहे. त्याचे कारण आहे की संस्थेमार्फत राबविण्यात येणारे विविध समाजोपयोगी कार्यक्रम हे होय. प्रगती फाउंडेशन ही 2005 पासून सामाजिक, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणारी एक सामाजिक संस्था आहे.

 

संस्था महिला, मुले, तरुण, वृद्ध आणि गरजू, ग्रामीण आणि शहरी जनतेच्या सक्षमीकरण आणि त्यंच्या जीवनात भेडसावत असलेल्या विविध समस्या मुक्तीसाठी वचनबद्ध आहे . समाजातील निराधार गरीब आणि वंचित लोकांना आधार देण्याचे कार्य संस्था गेली अनेक वषे यशस्वी पणे करीत आहे. बेरोजगार तरूणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार्भिमुख कौशल्य प्रधान कार्यक्रम आणि रोजगार मेळावे संस्था रज्यभर राबवित असते. समाजातील लोकांना चांगले आरोग्य प्राप्त होण्यासाठी आरोग्य शिबिर राबविणे, नेत्र चिकित्सा शिबिर राबविणे, रक्तदान शिबिर आयोजित करणे इत्यादी विविध उपक्रम राबविले जात आहेत. शिक्षण क्षेत्रात संगणक आणि डिजिटल तंत्रज्ञान साक्षरता मिशन संस्था महाराष्ट्रातील विविध भागात राबवित असते. महीला सक्षमीकरण क्षेत्रात संस्था गरजू आणि निराधार महिलांना प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हा संस्थेचा नेहमीच प्रयत्न असतो.

ग्रामिण, दुर्गम तथा आदिवासी भागातील शाळाना मदत करून शाळेतील विध्यर्थ्याना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सतत प्रयत्नशिल असते. गरीब वंचित समुदायाला तसेच आदिवासी पाड्यातील कुपोषित मुलांना सकस आहार पुरविण्यासाठी संस्था विविध उपक्रम राबवित असते. तसेच पर्यावर्णाचा समतोल राख़ण्यासाठी वृक्षारोपण, सोलार पॅनल (ग्रीन एनर्जी) आणि स्वछ पाणी पुरवठा असे अनेक पर्यावरण पुरक विषयी कार्यक्रम संस्था राबवित असते.