
मुंबई : नुकताच दहावीचा निकाल लागला आणि एस एस सी बोर्डाच्या घसरलेल्या निकालावर चर्चा सुरू झाली. दरम्यान एस एस सी बोर्डाच्या विध्यार्थ्याची तोंडी परीक्षा रद्द केल्याने, विध्यार्थ्याच्या निकालावर परिणाम झाला. यंदा दहावीचा निकाल सर्वात कमी लागलाआहे. त्यात CBSE आणि ICSE बोर्डाच्या विध्यार्थ्याचे लेखी आणि प्रॅक्टिकलचे मार्क्स धरल्याने त्यांची टक्केवारी अकरावी प्रवेशासाठी वरचढ ठरत आहे. यासगळ्यांचा विचार करून शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सर्व मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. यात असा मार्ग काढण्यात आला की, अकरावी प्रवेशासाठी CBSE आणि ICSE विध्यार्थ्याचे केवळ लेखी परीक्षेचे मार्क्स गृहीत धरण्यात यावे यामुळे एस एस सी बोर्डाच्या विध्यार्थ्यावर अन्याय होणार नाही. यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया तूर्तास थांबविण्यात येणार असून, याबाबतचा निर्णय शिक्षण विभाग जाहीर करणार असल्याचे खात्रीशीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समजते. दरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे हे केंद्रीय मंत्रालय, CBSE आणि ICSE बोर्डाशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे समजते. तेव्हा यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणार हे मात्र नक्की. यामुळे एस एस सी बोर्डाच्या विध्यार्थ्याना अकरावी प्रवेशासाठी समान संधी मिळत असली तरी इतर बोर्डाच्या विध्यार्थ्यामध्ये आणि पालकांमध्ये नाराजीचा सुर आहे. काही जण जर का असा निर्णय सरकारने जाहीर केला तर त्याच्याविरोधात कोर्टात जाण्याचा तयारीत आहेत अशावेळी सरकारचा हा निर्णय कोर्टात टिकणार का? हा एक मोठा प्रश्न आहे.






