भाजपाची तिसरी यादी जाहीर

मुंबई: भाजपने आज तिसरी यादी जाहीर केली. त्यात केवळ चार उमेदवारांची नावं आहेत. शिरपूरमधून काशीराम पावरा, रामटेकमधून मल्लिकार्जुन रेड्डी, साकोलीतून परिणय फुके आणि मालाड पश्चिममधून रमेश सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर तिसऱ्या यादीतील चार मिळून एकूण १४३ उमेदवारांची नावं आतापर्यंत जाहीर झाली आहेत. तिसरी यादी आली तरी त्यात खडसे, तावडे, बावनकुळे, मेहता आणि पुरोहित यांची नाव नसल्याने त्यांचं राजकीय भवितव्यही टांगणीला लागलं आहे. 

तसेच भाजपमध्ये दाखल झालेले नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांचंही तिसऱ्या यादीत नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.