पत्रकार अतुल आंबेरकर यांच निधन

महाराष्ट्र टाईम्सचे मुख्य उपसंपादक, अभ्यासू पत्रकार अतुल आंबेरकर यांच काल रात्री वयाच्या ४९ वर्षी निधन झाले आहे.

दैनिक ‘सामना’मध्ये काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर आंबेरकर हे ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मुख्य उपसंपादकपदावर रुजू झाले.

‘मटा’च्या पान क्रमांक एकची जबाबदारी त्यांनी दीर्घकाळ अतिशय कौशल्याने सांभाळली. आकर्षक मथळे देणे, बातम्यांचे ‘वजन’ अचूक जोखणे ही त्यांच्या कामाची प्रमुख वैशिष्ट्ये होती.

वाहनउद्योगातील अद्ययावत माहिती जाणून घेणे, त्यातील नवनवे ट्रेंड अभ्यासणे हे त्यांच्या आवडीचे प्रमुख विषय होते. त्यावर त्यांनी लिखाणही केले.

राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विषयांवरील प्रासंगिक लिखाणही ते करीत असत.