LACवर भारतीय आणि चिनी सैनिक यांच्यात हिंसक चकमक, एक भारतीय लष्कराचा अधिकारी आणि दोन सैनिक शहीद, चीनाचेही चार ते पाच सैनिक भरतामर्फत मारल्याचा चीनी मीडियाचा दावा

दोन्ही राष्ट्रांचा अमेरिकेस मध्यस्थी करण्यास नकार

लडाखच्या गॅलवान व्हॅलीमध्ये भारत-चीन सैन्याच्या दरम्यान झालेल्या हिंसक चकमकीत तीन भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लष्कराच्या अधिकार्‍याचा समावेश आहे. ही घटना सोमवारी रात्री घडली. सूत्रांच्या माहितीनुसार काही चिनी सैनिकही मारले गेले आहेत. तथापि, चीनने याची अधिकृतपणे पुष्टी केलेली नाही. दोन्ही बाजूंनी दगडांचा वापर केला गेला आहे. 

वृत्तसंस्था एनएनआयच्या वृत्तानुसार, सोमवारी रात्री लडाखच्या गालवान खोर्‍यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक झुंज झाली. यात भारतीय सैन्य दलातील एक अधिकारी आणि दोन सैनिक ठार झाले. दोन्ही देशांचे सैन्य उच्च अधिकारी घटनास्थळावर बोलणी करून परिस्थिती हाताळण्यात गुंतले आहेत.

गेल्या दीड महिन्यांपासून भारत आणि चीनचे सैन्य लडाखमध्ये लढत आहेत. चिनी सैनिक मोठ्या संख्येने येथे आले होते. दोन्ही देशांमध्ये वाटाघाटी सुरू होती. दोन्ही देशांकडून सैन्य माघार घेतल्याच्या बातम्या आल्या असून हा तणाव लवकरच संपेल असा विश्वास होता.

दरम्यान चीनी मीडिया ग्लोबल टाईम्स ने भरतामार्फत चीनचे चार ते पाच सैनिक मारल्याचा दावा केला आहे. चीनने अधिकृतरित्या याबाबत अद्याप पुष्टी केलेली नाही. चीनची कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण करण्याची रणनीती देखील असू शकते असे रक्षातज्ञांचे मत व्यक्त होत आहे. अमेरिकेने मध्यस्थी करण्याचे विचारले होते परंतु दोन्ही राष्ट्रांनी चीन आणि भारत यांनी अमेरिकेस मध्यस्थी करण्यास नकार दिला.