सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

राज्यातील शालेय परीक्षांबरोबरच सीबीएसई बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. केंद्राचे सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली. सीबीएसई बोर्डान दहावी व बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलैदरम्यान घेण्याचे निश्चित केलं होतं. मात्र, परिस्थितीत सुधारणा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

१ ते १५ जुलै दरम्यान घेण्यात येणाऱ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून, विद्यार्थ्यांना मागील तीन वर्गात मिळालेल्या गुणांचं मूल्यमापन करून मूल्यमापन केलं जाणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचं मंडळानं दिलेल्या गुणांवर समाधान होणार नाही, त्यांनी नंतर बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊ शकतात. केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.

राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या निर्णयाचे समर्थन केले असून याबाबत पालक आणि विद्यार्थी यांना दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटले आहे.