IPL T20 WOMEN CRICKET: Supernovas चा विजय; Trailblazers चा 2 धावांनी पराभव करत फायनलमध्ये धडक

महिला टी-20 चॅलेंजच्या (Women’s T20 Challenge) आजच्या निर्णायक सामन्यात हरमनप्रीत कौरच्या सुपरनोव्हासने (Supernovas) स्मृती मंधानाच्या ट्रेलब्लेझरचा (Trailblazers) फक्त 2 धावाने केला आणि तिसऱ्यानंद स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली.

आजच्या सामन्यात सुपरनोव्हासने पहिले फलंदाजी करत ट्रेलब्लेझरला 147 धावांचे लक्ष्य दिले होते ज्याच्या प्रत्युत्तरात मंधानाच्या टीमला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 143 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, आजच्या सामन्यात पराभव झाला असला तरी स्मृती मंधानाच्या टीमने फायनलमध्ये स्थान निश्चित केलं असून आता त्यांचा विजेतेपदासाठी सामना पुन्हा एकदा सुपरनोव्हासशी होईल. सुपरनोव्हासने यापूर्वी दोन वेळा स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. यासह मिताली राजच्या वेलॉसिटीचं (Velocity) स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहेत. सुपरनोव्हासने पॉसिटीव्ह नेट रनरेटच्या आधारावर फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे.

दरम्यान, सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर यांच्यात 9 नोव्हेंबर रोजी फायनल सामना खेळला जाईल. हरमनप्रीतच्या संघाचे लक्ष्य सलग तिसऱ्या विजेतेपदावर असेल तर स्मृतीचा संघ पहिल्या विजेतेपदासाठी मैदानावर उतरेल.