पर्रीकरांच्या निधनामुळे पणजीत रंगपंचमीचा उत्साह मावळला

1994 सालापासून सातत्याने पणजी मतदारसंघातून निवडून आलेल्या व मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री म्हणून काम केलेल्या मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे पणजीत गुरुवारी रंगपंचमीही साजरी झाली नाही. एरव्ही रंगपंचमीला पूर्ण पणजी रंगाने न्हाऊन निघत होती पण यावेळी पणजी शहरातील वातावरणात सगळीकडे उदासीनतेचा रंग भरून राहिला आहे, असा अनुभव आला.