तळीरामांना खुषखबर ; ४ मे पासून मद्यविक्रीस सशर्त परवानगी

नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने शुक्रवारी टाळेबंदीची मुदत १७ मेपर्यंत दोन आठवडय़ांसाठी वाढवण्याची घोषणा करतानाच, हरित व नारिंगी क्षेत्रांमधील अनेक निर्बंध उठवले होते.

४ मेपासून सुरू होणाऱ्या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात हरित व नारिंगी क्षेत्रांमध्ये केशकर्तनालये आणि सलून उघडण्यास परवानगी दिली आहे.

तसेच तिन्ही क्षेत्रांत मद्यविक्रीस मुभा देण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी स्पष्ट केले.