अन्यथा मुंबईत नाईट कर्फ्यु लावण्यात येईल, आयुक्तांचा इशारा

मुंबईत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. मात्र असे असले तरीही कोरोनाचा धोका अद्याप कमी झालेला नाही.

दरम्यान मुंबईचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी इशारा देत असे म्हटले आहे की, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल.

२ दिवसांपुर्वी मुंबईतील दोन ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते. लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मी मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे.

नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारले नाही तर आम्हाला नाईलाजाने नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल. याशिवाय आम्ही ओपिटॉम्म क्लब यांच्याविरोधात एफआयआरदेखील दाखल केल्याचे आयुक्तांनी सांगितलं आहे.