
ब्रिटेन येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ती म्हणजे ब्रिटेन येथे कोरोनाच्या नव्या रुपाने थैमान घातले आहे. यामुळे आता ब्रिटिश सरकारने देशातील चौथ्या टप्प्यात अधिक कठोर बंदी लागू केली आहे.
ब्रिटेनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक (Matt Hancock) यांनी असे म्हटले आहे की, हा नव्या प्रकारचा कोरोना व्हायरस अत्यंत धोकादायक आहे. तो देशात नियंत्रणाबाहेर गेला आहे. त्यामुळेच ब्रिटेन मधील बहुतांश ठिकाणी कठोर बंदी लागू केली गेली आहे. हा नवा कोरोना व्हायरस ब्रिटेनच्या दक्षिण-पूर्व परिसरात सर्वाधिक फैलाव करत आहे. या स्थिती मुळे देशांच्या विमानसेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
लंडनमध्ये ही पुन्हा एकदा चौथ्या टप्प्यातील नियम अधिक कठोर करत तेथे ही बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटिश सरकारने देशात आतापर्यंतचे सर्वाधिक कठोर नियम लागू केले आहेत. सरकारने क्रिसमसचे प्लॅन ही कमी केले आहेत.तर कोरोनाचे हे नवे रुप पाहता ब्रिटेनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडनसह साउथ ईस्ट मधील सर्व भागात येत्या 3 जानेवारी पर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या कोरोना व्हायरसमुळे सरकारने रहिवाशी परिसरात पोलीस तैनात केले आहेत. त्याचसोबत रेल्वे स्थानकात ही पोलीस कार्यरत असणार आहेत.






