“मराठा आरक्षणाबाबतचा उच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाही” – सुभाष देशमुख

मुंबई | मराठा आरक्षण मिळाल्याने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे. मात्र, राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना हा निर्णय पटलेला दिसत नाही.

उच्च न्यायालयानं दिलेला निकाल आम्हाला मान्य नाही. 12 ते 13 टक्के आरक्षण पुरेसं नाही, त्यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत.

प्रस्तावित 16 टक्के आरक्षण मिळावं यासाठी आग्रह धरणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलंय. मात्र, अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयात जायचं की नाही हे ठरवू, असं चंद्रकांत पाटील यांनी भूमिका घेतली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण कायम राहिल मात्र 16 टक्के देणं शक्य नसल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देणं शक्य असल्याचं मत न्यायालयाने नोंदवलं आहे.