नामांतर करताना मानहानी होऊन उद्रेक होणार नाही ना याचा विचार करावा – उदयनराजे भोसले

औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला आहे. यावरुन भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावर आता भाजप खासदार आणि छत्रपती घराण्याचे १३वे वंशज उदयनराजे भोसले यांनी यावर बोलताना असे म्हटले की,नामांतर करताना कोणाचीही मानहानी होऊन उद्रेक होणार नाही याचा प्रत्येकाने सविस्तर विचार करावा, असे बोलत त्यांनी सरकारला सुनावले आहे.

पुढे ते असं म्हणाले की, तसेच शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज हे केवळ महाराज होते म्हणून ते ओळखले जात नव्हते. त्यांची कर्तबगारीमुळे आणि लोक हिताच्या निर्णयामुळे ते ओळखत होते. ज्याप्रमाणे बॉम्बेचे मुंबई झाले. त्याप्रमाणे पूर्वीपासून असलेल्या औरंगाबादच्या बाबतीत नाव बदलायचे की नाही याचा लोकशाहीनुसार लोक निर्णय घेतील. अशी ही भूमिका उदयनराजे यांनी स्पष्ट केली आहे. आता सरकार नामांतर करणार का की काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.