राज यांनी घेतली ममतांची भेट

कोलकता: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची मुख्यमंत्री कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये ईव्हीएम व अन्य मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली.

चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत ईव्हीएमबाबतचा आपला आक्षेप पुन्हा एकदा नोंदवला. राज यांनीही ईव्हीएमवर आक्षेप घेत निवडणूक आयोग, कोर्ट या सगळ्यांवरचा आपला विश्वास उडाला असल्याचे सांगितले.