प्रगती फौंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील जि. प. शाळांना मोफत संगणक संच वाटप

मुंबईतील सामाजिक सस्था प्रगती फाऊंडेशन मार्फत रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात स्थापित असलेल्या चार जिल्हा परिषद शाळांना मोफत संगणक संच आणि Toy Library Kits वितरीत करण्यात आले.

तळई , गावाठे वाडी, भावशेट ठाकूर वाडी आणि तळा तालुक्यातील मेढे आदिवासीं वाडी जिल्हा परिषद शाळा अशा एकूण चार शाळांना पाच संगणक संच तसेच विद्यार्थ्याना खेळता खेळता शिकता यावे यासाठी Toy Library Kits वितरीत करण्यात आले. तसेच उपस्थित शिक्षक वर्गाना विषेश भेट वस्तू वाटप करण्यात आले.

पाली हे गाव अष्टविनायक गणपती बल्लाळेश्वर गणपतीचे स्थान आहे. येथील आदिवासी भागातील शाळेत डिजिटल classroom उभारणीचे काम सुरु आहे. प्रगती फौंडेशन ही संस्था संगणक साक्षरता अभियान संस्थेच्या स्थापनेपासून राबवित आहे. महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यातील काही शाळा दत्तक घेऊन त्याठिकाणी डिजिटल क्लासरूम तथा संगणक लॅब उभारणीचे कार्य करीत असते.

या भागांतील अनेक शाळांना आतापर्यंत अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल, स्कूलबग्, शाळेसाठी बेंचेश, खुर्च्या अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे. संगणक साक्षरता हे एक मिशन घेवून संस्थेमार्फत शाळांना संगणक संच पुरविण्यात आले. डिजिटल क्लासरूम चे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष किरण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत संस्थेच्या कार्यकारी संचालक सौ. सिद्धी किरण राणे आणि संस्थेचे आरोग्य विभाग तथा समन्वयक चिन्मय चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन भवाशेतठाकूरवाडी तालुका पाली जिल्हा सुधागड या जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले होते. चारही शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग तसेच गावातील शिक्षण व्यवस्थापन समिती सदस्य , ग्रामस्थ, पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.

सदर कार्यक्रम हा रा. जि. प. शाळा भावशेतठाकूरवाडी ता. सुधागड येथे दि. 13/02/2021 वार: शानिवार रोजी संपन्न झाला.

सदर शाळांना मदत उपलब्ध करून देण्याकरीता आय टी एम ग्रुप, श्री हरी हर पुत्र भजन समाज मंडळ तसेच श्री नितीन सर (CEO ITM GROUP) आणि प्रो. आर एस एस मणी सर (ITM VP/BMA PRESIDENT) यांचे सहकार्य लाभले.

शिक्षक श्री. बालाजी राठोड सर व अश्विणी पवार मॅडम शाळा भावशेतठाकूरवाडी , शिक्षक सौ. स्मिता पवार मॅडम श्री व्यंकट कागणे सर शाळा गावठेवाडी, शिक्षक लता इंगोले मॅडम जयश्री चौरे मॅडम शाळा रा. जि. प. शाळा मेढेआदिवासीवाडी, शिक्षक सौ: क्रांती. कोकाटे मॅडम सौ. सुजाता वारंगे मॅडम श्री हरिदास गंगथडे सर तसेच केंद्रप्रमुख: सौ.म्हस्के मॅडम केंद्रप्रमुख पाली शोभा खरात मॅडम केंद्रप्रमुख राबगाव तसेच शाळा व्यवस्थापण समितीचे अध्यक्ष काशिनाथ शिद व सर्व सदस्य व ग्रामस्थ मंडळी मोठया संखेने उपस्थित होते.


अधिक माहितीसाठी वाचा https://www.facebook.com/286699648026002/posts/4214644701898124/