
कोरोना महामारी विरुद्धच्या लढाईत आता महत्त्वपूर्ण टप्पा सुरु झाला आहे तो म्हणजे लसी करणाचा. कोरोना योद्ध्यानंतर आता सर्वसामान्य लोकांना लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. नवी मुंबईत सुध्दा व्यापक मोहीम सुरु करण्यात आली आहे.

परंतु लसीकरण करण्यासाठीं उपलब्ध करून देण्यातआलेले सरकारी हॉस्पिटल हे लांब अंतरावर आहेत. जुईनगर सारख्या भागात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत लस टोचून घेण्यासाठी वाशी येथील महानगर पालिका हॉस्पिटल किंवा नेरूळ येथील मीनाताई ठाकरे या सरकरी हॉस्पिटल मध्ये जावून लस टोचून घ्यावी लागते आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नाहक प्रवास करावा लागत आहे आणि त्रास सहन करावा लागत आहे. तसेच जुईनगर मध्ये काही खाजगी रुग्णालयात लस टोचून घेण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे परंतु त्यासाठी नागरीकांना दोनशे पन्नास रुपये खर्च करावे लागणार आहेत नेमकी हीच बाब लक्षात घेऊन जुई नगर विभागातील ‘ ब’ प्रभाग समिती सदस्य विजय साळे यांनी आयुक्तांना निवेदन देऊन जुई नगर वसियांसाठी जवळच सरकारी दवाखान्यात किंवा नवी मुंबई महनगरपालिकेच्य शाळेत कोरोना लसी करणासाठी सोय उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच याबाबात आरोग्य अधिकारी तसेच शासनाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.






