सोने-चांदी 13,000 रुपयांनी स्वस्त

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरला आणि अर्थव्यवस्था मोठ्या अडचणीत सापडली. 2020 दरम्यान सोन्याने गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिला. ऑगस्ट 2020 रोजी प्रति 10 ग्रॅम 57,008 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते, पण आता सोने (Gold Rate Today) जवळपास सर्वोच्च स्तरापासून आठ महिन्यांत 13 हजार रुपयांनी स्वस्त झालंय. 

शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी सोन्याची किंमत 7 ऑगस्ट 2020 पासूनच्या सर्वोच्च पातळीवरून 13,121 रुपयांनी घसरली असून, आता सोने प्रतितोळा 43,887 रुपयांवर आलेय. 7 ऑगस्ट 2020 ला चांदी 77,840 रुपये प्रतिकिलो होती, जी गेल्या शुक्रवारी 13,035 रुपयांनी घसरून 64,805 रुपये झाली. दरम्यान, दररोज सोन्याच्या भावात घसरण होत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणूक करावी की दुसऱ्या कशात याचा विचारात गुंतवणूकदार आहेत.