महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा हाहाकार

आज मुंबईमध्ये जवळजवळ 2 हजार रुग्णांची नोंद झाली असून महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने पुन्हा एकदा 15 हजाराचा टप्पा ओलांडला आहे. महत्वाचे म्हणजे पुणे (Pune) जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाने हाहाकार माजवला आहे. आज पुणे जिल्ह्यात तब्बल 3,267 रुग्णांची नोंद व 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात आज नव्याने 1,740 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 2,18,203 इतकी झाली आहे.

काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाढत असलेल्या कोरोना विषाणू (Coronavirus) संसर्गाने पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

महाराष्ट्राची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल; मुंबई, पुणे, नागपूरसह औरंगाबाद येथीलही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसून येते आहे.