
नागपूर : विनाअनुदानित शिक्षण संस्था असल्याने माहितीच्या अधिकारात माहिती पुरवणे बंधनकारक नसल्याचा निर्वाळा माहिती आयोगाने दिला होता. पण, त्या आदेशाला रद्द ठरवत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांला मोठा दिलासा दिला. तसेच माहिती अधिकाराच्या मूळ अर्जावर पुन्हा सुनावणी घेऊन नव्याने निर्णय घेण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने दिले.
डॉमनिक गॅब्रियल फिलिप यांच्या याचिकेवर न्या. अतुल चांदूरकर यांनी हा आदेश दिला. डॉमनिक यांनी १४ जून २०१३ ला मोहननगर परिसरातील सेंट जॉन्स हायस्कूलच्या प्राचार्य आणि माहिती अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज केला होता. पण, शाळेने शिक्षण संस्था पूर्णपणे खासगी स्वरूपाची असून शासनाकडून कोणत्याही प्रकारचे अनुदान घेत नाही. त्यामुळे माहिती अधिकार कायदा लागू होत नसल्याचे उत्तर देऊन अर्ज फेटाळला.





