Corona Update: राज्यात दिवसभरात ११३ नवे रुग्ण,१३ जणांचा मृत्यु,कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७४८,मृतांचा आकडा ४५ वर

मुंबई – राज्यात आज (रविवारी) कोरोनाबाधित ११३ नवीन रुग्णांची आज नोंद झाली.यामुळे राज्यातील रुग्ण संख्या ७४८ झाली आहे. राज्यात नवीन १३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांचा एकूण आकडा ४५ झाला आहे.

आतापर्यंत ५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात विविध जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

मुंबई – ४०६
पुणे – १०३
ठाणे – ७७
सांगली – २५
अहमदनगर – २०
नागपूर – १७
लातूर – ८
बुलडाणा – ५
औरंगाबाद – ५
यवतमाळ – ४
सातारा – ३
उस्मानाबाद – ३
रत्नागिरी – २
कोल्हापूर – २
जळगाव – २
वाशिम – १
सिंधुदुर्ग – १
नाशिक – १
हिंगोली – १
गोंदिया – १
आमरावती – १
इतर – ६०