
IPL 2021 Points Table Updated: आयपीएलच्या (IPL)14व्या मोसमात आजच दुसरे डबल-हेडर सामने खेळण्यात आले. पहिल्या सामन्यात सनरायडर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पंजाब किंग्सविरोधात बाजी मारली तर दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरोधात रोमहर्षक विजय मिळवला. हैदराबाद आणि चेन्नईच्या विजयानंतर एकीकडे सुपर किंग्सने पॉईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी झेप घेतली तर सनरायझर्सने गुणतालिकेत खातं उघडलं आहे. चेन्नई +1.142 अशा पॉसिटीव्ह रनरेटमुळे पहिल्या स्थानी पोहचली आहे तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला (Royal Challengers Bangalore) त्यांनी दुसऱ्या स्थानी ढकलले. यानंतर, हैदराबादने पाचव्या क्रमांकावर पोहचली आहे. दुसरीकडे, पराभवाचा कोलकाता व पंजाब संघाला फटका बसला ज्यांची अनुक्रमे 7व्या, 8व्या स्थानी घसरण झाली आहे.
मुंबई इंडियन्स सहाव्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात आहेत तर बेंगलोरसह पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाला आजवर एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात मुंबई इंडियन्स सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यांच्या नावावर पाच विजेते आहेत तर चेन्नई सुपर किंग्जने तीन जिंकली आहेत. केवळ कोलकाता नाइट रायडर्स (2012 आणि 2014), सनरायझर्स हैदराबाद (2016) आणि राजस्थान रॉयल्स (2008) विजेतेपद जिंकणारे इतर संघ आहेत.











