IPL 2021 SENSATIONAL VICTORY: KKR vs DC: राहुल त्रिपाठीचा विजयी षटकार, कोलकाता नाईट रायडर्सचा दिल्लीवर रोमांचक विजयासह फायनलमध्ये प्रवेश

शारजाह येथे रंगलेल्या रंगतदार क्वालिफायर-2 मध्ये इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 3 विकेटने धमाकेदार विजय मिळवून यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आहे. मोक्याच्या क्षणी राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) विजयी षटकार मारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आता केकेआरचा सामना तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सशी (Chennai Super Kings) 15 ऑक्टोबर रोजी होईल. केकेआरने (KKR) टॉस जाणून दिल्लीला पहिले फलंदाजीला बोलावले. प्रत्युत्तरात दिल्ली फलंदाज बॅटने प्रभावी हल्ला करण्यात अपयशी ठरल्यामुळे संघ 135 धावाच करू शकला. अशा परिस्थितीत कोलकाताने 19.5 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून लक्ष्य साध्य केले आणि दिल्लीचे सलग दुसरे आयपीएल फायनल गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. केकेआरच्या विजयात व्यकटेश अय्यर 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच शुभमन गिल 46 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्लीसाठी कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर आवेश खान, आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली.