मराठी पत्रकारिता प्रशिक्षण नवी मुंबईत

नवी मुंबई: प्रगती फौंडेशन आणि नवी मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबई नेरुळ येथे मराठी पत्रकारिता अभ्यासक्रम बॅच – 3 लवकरच सुरू होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री. किरण राणे यांनी दिली.

आतापर्यंत दोन बॅचेस यशस्वीपणे पार पडून अनेक विदयार्थी अनेक नामवंत वर्तमानपत्र व प्रसारमाध्यमे यामध्ये कार्यरत आहेत तर काहीजणांनी स्वतःचे वर्तमानपत्र अथवा प्रसारमाध्यमे सुरु केली आहेत. नवीन अभ्यासक्रम तीन महिन्याचा असून यात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेब मीडिया यांचा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात विविध प्रात्यक्षिके व विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेट यांचा समावेश करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात भेट द्या किंवा (022)-27723122 मो’ 9920480613 // 8097602511 या क्रमांकावर संपर्क साधला.