मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर पुन्हा दरड कोसळली, दोन्हीही बाजूची वाहतूक बंद.

पुणे: रात्रीपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई – पुणे रेल्वे मार्गावर ठाकूर वाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळली. यामुळे दोन्हीही दिशेने जाणाऱ्या रेल्वे लाईन बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान घटनास्थळी रेल्वेचे पथक दाखल झाले असून रेल्वे रुळावरून दरडी बाजूला करण्याचे काम सुरू आहे.

दोनच दिवसांपूर्वी अशा प्रकारची घटना घडली होती आणि पुन्हा एकदा याच ठिकाणी दरड कोसळली. यामुळे प्रश्न विचारला जात आहे की पावसाळ्यापूर्वी प्रशासनाने आणि रेल्वेने काय खबरदारी घेतली होती?