IPL 2021 KKR VS PBKS : पंजाब किंग्ज विरुद्ध सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा 5 विकेट्सने विजय

आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील 21 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने पंजाब किंग्ज विरुद्ध 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. आज कोलकाता नाईट राइडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना रंगला होता. या सामन्यात कोलकाता नाईट राइडर्सला विजय मिळाला आहे. नाईट राइडर्सने पंजाब किंग्जला ५ विकेटनी पराभूत केले आहे.

केएल राहुल याच्या नेतृत्वात पंजाब किंग्जने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ९ बाद १२३ धावा केल्या. नाईट राइडर्स समोर १२४ धावांचे लक्ष होते. त्यांनी हे लक्ष १६.४ ओवरमध्ये ५ विकेट गमवून पूर्ण केले. सलग ४ सामने हारल्यानंतर नाइट राइडर्सला हे यश मिळाले आहे. त्यामुळे, आता आयपीएलच्या गुण सारणीमध्ये नाईट राइडर्स ५ व्या स्थानावर विराजमान झाले आहे, तर पंजाब हे सहाव्या स्थानावर आहे.

किंग्जकडून मिळालेले लक्ष पूर्ण करण्यासाठी कोलकाता नाईट राइडर मैदानात उतरली, मात्र येथे १७ धावातच नाईट राईडर संघ ३ विकेट गमवून बसले. नीतीश राणा हा शुन्यावर बाद झाला, सुनील नरेन एक रन देखील काढू शकला नाही आणि शुभम गील काही खास कामगिरी करू शकला नाही. तो फक्त नव धावाच काढू शकला. त्यानंतर मात्र, इयन मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाला संभाळले आणि अंक तालिकेवर आकडे वाढवले.

कप्तान मॉर्गन याने ४० चेंडूत ४७ धावा केल्या, तर त्रिपाठी याने ३२ चेंडूत ४१ धावा केल्या. राहुल याला दीपक हुड्डा याने बाद केले. ८३ धावांवर संघाचे चार गडी पराभूत झाल्यानंतर आंद्रे रसेल मैदानात आला, मात्र तो देखील १० धावांवर बाद झाला. त्याला अर्शदीपने धावबाद केले. त्यानंतर दिनेश कार्तिकने मॉर्गनबरोबर १२ धावा केल्या.