IND vs ENG 1st Test Day 3: चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी भारतावर फॉलोवोनचे गडद संकट

चेन्नई (Chennai) येथे भारत (India) आणि इंग्लंड (England) संघात खेळल्या जाणार्‍या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा डाव 578 धावांवर आटोपल्यावर टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या दिवसाखेर 6 बाद 257 धावा केल्या आहेत.

इंग्लंडने पहिल्या डावात केलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात भारतीय संघ (Indian Team) अद्याप 321 धावांनी पिछाडीवर आहे. 100च्या आता भारताने पहिले 4 विकेट गमावल्यावर रिषभ पंत (Rishabh Pant) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) यांच्या शतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. पंत आणि पुजाराच्या शतकी भागीदारीमुळे भारतीय संघाने 200 धावांचा पल्ला पार केला आहे.

पंतने झटपट फलंदाजी करत धावसंख्येचा वेग वाढवला मात्र तो पुन्हा एकदा नर्व्हस 90चा शिकार झाला आणि अवघ्या 9 धावांनी त्याचं शतक हुकलं.  पंतने 44 चेंडूचा सामना करत 9 चौकार आणि 5 षठकाराच्या मदतीने 91 धावांचा पाऊस पाडला. भारतासाठी जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. भारताला फॉलोवोन ची नामुष्की टाळायला अजून 123 धावांची आवश्यकता आहे. मैदानावर आता रविचंद्रन अश्विन आणि वॉशिंग्टन सुदर खेळत आहेत.