नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन च्या माध्यमातून सानपाडा येथे भव्य रक्तदान शिबिराच आयोजन


नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन च्या माध्यमातून सानपाडा येथे 9 मे 2021 रोजी (भव्य रक्तदान) शिबिराच आयोजन करण्यात आलं होत. या शिबिरास 150 लोकांची उपस्थिती सोशल डिस्टन्स पाळून लाभली आणि 50 पेक्षा जास्त रक्त संकलन करण्यात आले.


कॅटरिंग आणि डेकोरेशन व्यवसायशी निगडित सर्वच व्यवसाय हे लोकडाऊन मुळे गेली 12 महिने बंद असताना, या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.अशी अनेक संकटे डोक्यावर घोंगवत असताना देखील, देशामध्ये कोरोना महामारीने डोके वर काढलेलं असताना, कोरोना रुग्णांना रक्ताची गरज मोठया प्रमाणात भासत आहे आणि 18 + लोकांनी वॅक्सीनेशन केल्यावर त्या व्यक्तीला पुढील 3 महिने रक्तदान करता येणार नाही ही बाब लक्ष्यात घेता नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन च्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होत.


या कार्यक्रमाला बॉम्बे कॅटरिंग असोसिएशन चे अध्यक्ष आणि सभासद व स्थानिक माजी नगरसेवक श्री. दशरथ भगत ,निशांत भगत , गिरीश म्हात्रे , सुरज पाटील , मनसे चे गजानन काळे आणि नेरुळ चे शिवसेना विभाग प्रमुख घाग आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे तोड भरून कौतुक केल.