
मुंबई: आज जाहीर करण्यात आलेला रिक्षा चालकांचा राज्यव्यापी संप तूर्तास मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीमुळे तूर्तास मागे घेण्यात आला आहे.
सोमवारी दुपारी परिवहन सचिव आशीष कुमार सिंह यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यामुळे ८ जुलैच्या मध्यरात्रीपासून मुंबईसह राज्यात रिक्षाचालकांनी संप पुकारला होता.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत बैठक घेऊन रिक्षाचालकांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांनी दिले. यामुळे संप मागे घेण्यात येणार असल्याची माहिती शशांक राव यांनी दिली. मंगळवारच्या बैठकीत रिक्षाभाडेवाढीसह राज्यातील अवैध वाहतुकीस आळा घालणे, रिक्षाचालकांसाठी महामंडळ स्थापन करणे या मुद्द्यांवर चर्चेतून तोडगा काढणे अपेक्षित आहे.






